Angaraki Sankashti Chaturthi | 21 वर्षांनी जुळून आलेला योग, Siddhivinayak मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!
दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त विशेष तयारी करण्यात आली होती. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तब्बल एकवीस वर्षांनंतर श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा योग जुळून आल्याने भाविकांमध्ये उत्साह होता. या दुर्मिळ योगामुळे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. अनेक भाविक सकाळीच बाप्पाच्या चरणी दर्शनासाठी आले होते. काही भाविकांनी सांगितले की, ते प्रत्येक संकष्टीला मंदिरात येतात. एकवीस वर्षांनी हा योग आल्याने भाविकांनी "खूप आनंद आहे" असे सांगत आपला आनंद व्यक्त केला. संपूर्ण मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसर गजबजून गेला होता.