
कोरोनामुळे आंगणेवाडीची जत्रा यंदा भाविकांविना; जत्रेच्या वेळी मालवण, कणकवली, मसुरे मार्ग सील
Continues below advertisement
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी इथल्या भराडी देवीची यात्रा 6 मार्च रोजी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ आंगणे कुटुंबियांपुरती मर्यादित यात्रा होणार आहे. आंगणे कुटुंबातील 50-50 व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. अन्य भाविकांना यात्रेत अथवा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अन्य भाविकांसाठी आंगणेवाडीत येणारे मालवण, कणकवली, मसुरे हे मार्ग पोलीस प्रशासनाकडून सील केले जातील, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.
Continues below advertisement