Andhericha Raja 2023 : अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी वस्त्रसंहिता जाहीर ABP Majha
Continues below advertisement
नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या अंधेरीचा राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हाप पॅन्ट आणि शॉर्ट स्कर्ट घालून येण्यास मनाई करण्यात आली आहे. मागील वर्षी याच मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मंडळाच्या या निर्णयाला अनेक संघटनांकडून विरोधही झाला मात्र आझाद नगर सार्वजनिक गणपती उत्सव समिती आपल्या या निर्णयावर यावर्षी देखील ठाम आहे. दरम्यान, यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याने मंडळाने देखावा म्हणून शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती उभारली आहे. महत्त्वाचं म्हणजे, अंधेरीचा राजा अनंत चतुर्दशीला विसर्जित न करता दरवर्षी संकष्टी चतुर्थीला वर्सोवा येथे समुद्रात विसर्जन केले जाते.
Continues below advertisement