Andheri L&T Fire | अंधेरी L&T कंपनीला आग, शॉर्ट सर्किटमुळे बेसमेंटमध्ये
मुंबईतील अंधेरी येथील L&T कंपनीच्या बेसमेंटमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणात काळा धूर बाहेर पडत आहे. कंपनीचे कर्मचारी पावसाच्या साचलेल्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाचे काही साहित्य काम करत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून हे प्रयत्न सुरू आहेत. आगीवर अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. मुंबईत जोरदार पाऊस सुरू असतानाच ही आग लागल्याने परिस्थिती अधिक आव्हानात्मक बनली आहे. बेसमेंटचा भाग असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे. कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू असून, आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.