AAnant Karamuse Beating : अनंत करमुसे मारहाण प्रकरणी 500 पानांचं आरोपपत्र दाखल : ABP Majha

Continues below advertisement

अनंत करमुसे मारहाणप्रकरणी ठाणे पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर ५०० पानांचं चौथं आरोपपत्र दाखल केलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे मविआच्या काळात मंत्री असताना त्यांचे मॉर्फ केलेले फोटो करमुसेंच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हायरल झाले होते. त्यानंतर आव्हाडांच्या निवासस्थानी करमुसे यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. हे प्रकरण कोर्टात गेलं. करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयानं ठाणे पोलिसांना ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे ५०० पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola