Anandacha Shidha : दिवाळी तोंडावर, मात्र काही पुणेकर अजूनीही शिध्यापासून वंचित
दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं जाहीर केलेला आनंदाचा शिधा अनेक रेशन दुकानात दाखल होण्यास सुरुवात झालीय.. तर अनेक दुकानं अजूनही या 100 रुपयांच्या किटच्या प्रतीक्षेत आहेत.. काही ठिकाणी सगळ्या वस्तू पोहोचल्या नसल्यानं तर काही ठिकाणी किटच्या पिशव्या मिळाल्या नसल्यानं वितरण रखडलंय. दिवाळीसाठी रेशनिंग दुकानातून 100 रुपयांत रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा सरकारनं केली. ((या वस्तू पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो असलेल्या पिशवीतून देण्यात येणार आहेत. सरकारच्या घोषणेनंतर या वस्तू वेळेत वितरित झाल्या नसल्याचं वास्तव माझाने समोर आणलं. त्यानंतर अन्न व नागरीपुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 20 तारखेपर्यंत या वस्तू पोहोचतील असं आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही सगळ्या रेशन दुकानावर किट पोहोचलेल्या नाहीत.