Aanandacha Shidha : गौरी गणपती तसेच दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा दिला जाणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. गौरी गणपती तसेच दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा दिला जाणारेय. यात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेलाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे आणि पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवली जाणार असून, त्यासाठी ५ हजार कोटीचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. दरम्यान, महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय.
Tags :
Diwali Sugar State Cabinet Meeting Edible Oil Important Decisions Decisions Chandal Gauri Ganapati Happy Meal Semolina Maharashtra Casino Act