Electric Bicycle :ग्रामीण भागात तरुणाने तयार केली इलेक्ट्रीक सायकल,आनंद महिंद्रांकडून व्हीडिओ शेअर

आपल्या भारतात टॅलेंटची कमी नाहीये. हे क्षणाक्षणाला सिद्ध होत असतं. आणि अशाच प्रकारचं टॅलेट सोशल मीडियावर आपल्याला पहायला मिळतं. हल्ली इलेक्ट्रीक बाईक आणि इलेक्ट्रीक कार पाठोपाठ आता इलेक्ट्रीक सायकलचाही शोध लागलाय. तुम्हालाही ऐकून जरा आश्चर्य वाटेल पण हे खरंय. एका ग्रामीण भागातील तरुणांनी चक्क इलेक्ट्रीक सायकल तयार केलीय. या सायकलची रचना बघितल्यानंतर तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.  कारण या सायकलवर एक नाही दोन नाही तर चक्क ६ जणं प्रवास करतात. या सायकलचा व्हीडिओ या तरुणांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आणि क्षणार्धात व्हायरल झाला. महिंद्रा उद्योग समुहाचेे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी हा व्हीडिओ आपल्या ट्वीटर हँडलवर शेइर देखील केला. एका चार्जमध्ये १५० किलोमीटर पर्यंत सायकल चालेल असा या मुलांचा दावा आहे. त्यामुळे ही सायकल नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसतेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola