Bhegadi Deool | अमरावतीमधील भेगडीत 'देऊळ' चित्रपटाची पुनरावृत्ती | ABP Majha
देऊळ चित्रपटाची पुनरावृत्ती म्हणावी असा प्रकार अमरावती जिल्ह्यातील भेगडी गावात घडलाय. एका माळरानावर मोहाच्या झाडाखाली देव असल्याच्या भावनेतून ग्रामस्थांनी मोठी गर्दी केलीय. गावातील एका 25 वर्षीय तरुणाला काही दिवसांपूर्वी एक स्वप्न पडलं. गावातील मोहाच्या झाडाखाली शंकर-पार्वतीचं वास्तव्य असल्याचा साक्षात्कार त्याला झाल्याचं सांगितलं जातंय. तेव्हापासून या मोहाच्या झाडाखाली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकच गर्दी केलीय.