Amravati : Corona मृत्यूचे आकडे कोण लपवतंय? मृत्यू 1600, मात्र सानुग्रह मदतीचे अर्ज 3000
कोरोना मृत्यूसाठी सरकारकडून मिळणाऱ्या सानुग्रह मदतीसाठी अमरावती जिल्ह्यात दुप्पट अर्ज दाखल झाले आहेत. अमरावतीत सरकार दफ्तरी एकूण १ हजार ६०० कोरोना मृत्यूंची नोंद आहे. मात्र 50 हजारांच्या मदतीसाठी एकूण ३ हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सरकारकडून आकडे लपवले जातायत, की अनुदानासाठी लोक खोटे अर्ज करतायत, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.