Amravati Violence : अमरावतीत हिंसाचारानंतर संचारबंदी, इंटरनेट सेवा तीन दिवस बंद राहणार

अमरावतीमध्ये गेले दोन दिवस झालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्रिपुरातील घटनेनंतर शुक्रवारी काही संघटनांनी काढलेल्या मोर्चात तोडफोड करण्यात आली. त्यानंतर काल भाजपनं पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल्यानंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपनं आज अमरावती जिल्हा बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. हिंसाचाराबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत असल्यानं जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. अमरावतीमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola