Amravati violence : अमरावतीतील इंटरनेट सेवा दुपारनंतर पूर्ववत होण्याची शक्यता ABP Majha

Continues below advertisement

त्रिपुरातील कथित घटनेनंतर झालेल्या हिंसाचारामुळे अमरावती शहर वगळता जिल्ह्यातील संचारबंदी सलग चौथ्या दिवशी कायम आहे. तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा आणखी २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आलीए. त्यामुळे आज दुपारनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. पण उद्यापासून इंटरनेट सेवा सुरु होते की बंदच राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर तिकडे अमरावतीतील दंगल भडकवल्याप्रकरणी अटक केलेले भाजप नेते अनिल बोंडेंसह सर्व भाजप नेत्यांना जामीन मंजूर झालाय. काल सकाळी अमरावती पोलिसांनी बोंडेंसह भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, गटनेते तुषार भारतीय, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्यासह १२ जणांना अटक केली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram