Amravati : अमरावती नौका दुर्घटनेतील बेपत्ता 8 जणांचा शोध सुरुच, तिघांचे मृतदेह सापडले

Continues below advertisement

अमरावती : जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे अनेक भक्तगण दर्शन आणि दशक्रियाविधी पार पाडण्यासाठी येत असतात.  मंगळवारी सकाळी तीन कुटुंबं दशक्रियाविधी पार पाडण्यासाठी आले असता होडी उलटल्याने 11 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील तीन जणांचे मृतदेह हाती आले असून अन्य लोकांचा शोध सुरु आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे अनेक भक्तगण दर्शनसाठी तर काहीजण दशक्रिया पार पाडण्यासाठी येत असतात. आज सकाळी एकाच नात्यातील तीन कुटुंब दशक्रिया पार पाडण्यासाठी आले असता या तीन कुटुंबातील अकरा सदस्य वर्धा नदीत होडी उलटल्याने बुडाल्याची घटना घडली. यात तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून आठजण बेपत्ता असून त्यांचं शोधकार्य सुरू आहे. या शोध कार्यासाठी तालुका प्रशासनातील सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच आमदार देवेंद्र भुयार घटनास्थळावर दाखल आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने युद्धस्तरावर बचाव कार्य सुरू आहे. अमरावती जिल्हा प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे. वरुड तालुक्यात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram