Amravati News | प्रेमविवाह न करण्याची शपथ प्रकरणी तीन प्राध्यापक निलंबित | ABP Majha
Continues below advertisement
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना प्राध्यापकांनी प्रेमविवाह करणार नसल्याची शपथ 13 फेब्रुवारी रोजी देण्यात आली होती. या प्रकरणी तीन जण निलंबित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीचं कॉलेज बाहेर गेटवर आंदोलन सुरु करण्यातं आलं आहे. या तिघांचं निलंबन मागे घ्या अशी ठाम भूमिका विद्यार्थीनींनी घेतली आहे.
प्रेमविवाह न करण्याची शपथ प्रकरणी प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे, प्रा. प्रदीप दंदे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी विजय कापसे यांना निलंबीत करण्यात आले आहे. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीने प्राचार्यांसह दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. मात्र या प्रकरणाची चौकशी समितीमार्फत चौकशी होण्याआधीच यांना निलंबीत करण्यात आलं आहे.
Continues below advertisement