Amravati : राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा शिवरायांचा पुतळा ? उड्डाणपुलावर पोलिसांचा तडगा बंदोबस्त
Amravati : राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा शिवरायांचा पुतळा ? उड्डाणपुलावर पोलिसांचा तडगा बंदोबस्त
अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला जाण्याची शक्यता आहे. कारण काल एकाच दिवसात राजापेठ उड्डाणपुलावर चौथरा तयार करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याच्या कार्यकर्ते शिवरायांचा पुतळा उड्डाणपुलावर बसणार असल्याची माहिती मिळतेय. या पार्श्वभूमीवर रात्रीपासूनच राजापेठ उड्डाणपुलावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलाय. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी आमदार रवी राणा यांनी उड्डाणपुलावर शिवरायांचा अनधिकृत पुतळा बसवल्यामुळे वाद उफाळून आला होता. परवानगी न घेता पुतळा बसवल्याने महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने पुतळा हटवला होता. त्यावरुन पालिका प्रशासन आणि आमदार रवी राणा यांच्यात मोठा वाद निर्माण होऊन राजकारण तापलं होतं.
Amravati : राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा शिवरायांचा पुतळा ? उड्डाणपुलावर पोलिसांचा तडगा बंदोबस्त