Amravati : अखेर त्या 20 वानरांना शोध आणि बचाव पथकाकडून जीवदान
अमरावती मधील सामदा काशिपुर इथल्या धरणाच्या मध्यभागी असलेल्या झाडावर माकडांची झुंड अडकून पडली होती. पावसामुळे हे झाड पाण्याने वेढलं होतं.याची माहिती मिळताच जिल्हा शोध पथकांनी बोटींच्या सहाय्यानं या माकडांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तसंच पक्षांची अनेक घरटीही याठिकाणी पडली होती. ती घरटी ही सुखरुप पणे बाहेर काडण्यात आली... या रेस्क्यूत 20 वानरांना वाचवण्यात यश आलं आहे.