Amravati Samruddhi Mahamarg : नुकसान भरपाई कधी मिळणार? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल ABP Majha
Continues below advertisement
अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गाच्या कामामुळे महामार्गाला लागून असलेल्या शेतीचं पावसाळ्यात मोठं नुकसान झालं होतं. १० जूनला झालेल्या पावसामुळे महामार्गालगतचच्या शेतांमधील पिकं वाहून गेली. तर नव्या महामार्गामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचलं होतं. हा नवा महामार्ग शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. या बातमीनंतर नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. ही मदत तातडीने मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय..
Continues below advertisement