Amravati: राजापेठ उड्डाणपुलावरील शिवरायांचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा ABP Majha

Continues below advertisement

आमदार रवी राणा यांनी शिवाजी महाराजांचा राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला पुतळा मनपाने काही दिवसांपूर्वी हटवला होता. यावेळी मोठा वाद होऊन मनपा आयुक्तांवर शाई देखील फेकण्यात आली होती. या सर्व घडामोडीनंतर आज मनपाच्या आमसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे बसविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मुंबईतील अरबी समुद्रात प्रस्तावित असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या धर्तीवर अमरावतीच्या छत्री तलाव परिसरात एक भव्य स्मारक तयार करण्यात येईल तसेच राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचा पुतळा उभारण्यात येईल अशी माहिती महापौर चेतन गावंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तसेच 12 जानेवारी पूर्वी उड्डाणपुलावर पुतळा उभारण्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी मागण्यात आली नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केले..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram