Amravati Navneet Rana:राणांनी चुकीच्या पध्दतीनं पुतळा बसवला,पुतळ्याल कॉंग्रेसचा विरोध नाही -देशमुख

अमरावतीत महापालिकेच्या परवानगीशिवाय राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन चांगलच राजकारण सुरु झालंय... विनापरवाना हा पुतळा बसवला म्हणून महापालिकेनं पोलिसांच्या मदतीनं महाराजांचा पुतळा हटवला, त्यानंतर आता राणा दाम्पत्यांकडून जोरदार निदर्शनं करण्यात येतायत...  पुतळा बसवणारे आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत यांना पहाटेपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. ... आणि यावरुनच आता राणा दाम्पत्यांचे समर्थक आक्रमक  झालेयत... तर दुसरीकडे काल रातोरात दर्यापूरमध्ये शिवसेनेकडून शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलाय.. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसंच पुतळा बसवणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola