Navneet Rana Acid Attack Threat | खासदार नववीत राणा यांना Acid Attack ची धमकी
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. चेहऱ्यावर अॅसिड टाकून जीवेमारण्याची धमकी नवनीत राणा यांना निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. शिवसेनेच्या लेटरहेडवरुन आपल्याला हे पत्र आल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे.
8 फेब्रुवारीला संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर खासदार नवनीत राणा यांनी जे भाषण केलं होतं. त्या भाषणाचा उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे. लोकसभेत केलेल्या भाषणात नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर टोलेबाजी केली होती. याच भाषणाच्या आधारे हे पत्र आलेलं आहे. शिवसेनेच्या लेटरहेडवर हे पत्र आलेलं आहे. मात्र त्या लेटरहेडवर कोणताही पत्ता नसून केवळ शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आहे. तसेच पत्राच्या शेवटी सच्चा शिवसैनिक असंही लिहलं आहे.
अॅसिड हल्ल्याची धमकी देणाऱ्या पत्रासंदर्भात दिल्लीतील पोलीस स्थानकात नवनीत राणा यांनी तक्रार दाखल केलेली आहे. नवनीत राणा यांनी आलेल्या या धमकीच्या पत्रातील मजकूर मराठीत आहे. परंतु, पत्रातील भाषा पुर्णपणे धमकीची आहे. आमदार रवी राणा यांचासुद्धा या पत्रात उल्लेख असून तुझ्या नवऱ्याचा सुद्धा लवकरच बंदोबस्त करणार असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 13 फेब्रुवारीला नवनीत राणा यांनी रितसर तक्रार दाखल केली असून दिल्ली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Tags :
Amravati MP Navneet Rana Navneet Rana Threatened With Acid Attack Shiv Sena Letterhead MP Navneet Rana Amravati Shiv Sena