अवकाळीचा तडाखा! अमरावतीत चांदूरबाजारात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, कांदा,बाजरी,गहू,ज्वारीचं नुकसान
अमरावती जिल्ह्याच्या आठ तालुक्यात गारपीटसह जोरदार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. गारपीटीने गहु, संत्र, हरभरा, कांदा, आंब्यांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय.