Amravati : अमरावतीकरांनो, या प्रदर्शनाला भेट द्या; रंगबेरंगी आणि आकर्षक फुलांचे प्रदर्शन
अमरावतीमध्ये गार्डन क्लबच्या वतीने पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पुष्प प्रदर्शनात ३०० हून अधिक प्रकारची फुले पाहायला मिळतायेत.. अमरावतीच्या विश्व भारती पब्लिक स्कूल परिसरात हे दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलंय.. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.