Amravati Daryapur : अमरावतीच्या दर्यापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला ABP Majha

अमरावतीच्या दर्यापूरमध्ये विनापरवाना बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवलाय. दर्यापूर नगरपालिका आणि पोलिसांनी ही कारवाई केलीय. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात विनापरवाना शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. आमदार रवी राणा यांनी राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवाना बसवलेला शिवरायांचा पुतळा हटवल्यानंतर दर्यापूरमधील पुतळा हटवण्याची तयारी सुरु झाली होती. त्यामुळे हा पुतळा काढू नये यासाठी दर्यापूरमध्ये सर्वपक्षीयांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आलं होतं. तसंच पुतळा हटवू नये या मागणीसाठी काल दुपारी दर्यापूरात शेकडो कार्यकर्ते चढले पाण्याच्या टाकीवर चढले होते. मात्र मध्यरात्री तीनच्या सुमारास नगरपालिका आणि पोलिसांनी हा पुतळा हटवलाय. ((त्यामुळे दर्यापूरमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.)) तिकडे राजापेठ उड्डाणपूलावरील शिवरायांचा पुतळा हटवल्याच्या मुद्द्यावरुन युवा स्वाभिमान पालिका आयुक्तांविरोधात पोलिसात तक्रार करणार आहे. तसंच युवा स्वाभिमान पक्षाचे तीन नगरसेवक राजीनामे देणार आहे. त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्यावरुन अमरावतीचं वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola