Amravati Corona : अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक, 130 गावं सील!
Continues below advertisement
अमरावती महापालिका क्षेत्रात वर्षभर धुमाकूळ घातल्यानंतर कोरोना संसर्गाची वक्रदृष्टी आता ग्रामीण भागाकडे वळली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये आतापर्यंत तब्बल 32 हजार 602 रुग्ण आणि 536 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. गुरुवारी जिल्ह्यात 1189 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, यात महापालिका क्षेत्रातील 307 आणि ग्रामीणमधील 882 जणांचा समावेश आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्णांचे प्रमाण सध्या जास्त आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांतील 'हॉट स्पॉट' असणारी 130 गावे सील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी दिली. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हॉटस्पॉट असणारी आणखी काही गावे सील करणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना केअर सेंटर उघडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Corona Amravati Amravati News Maharashtra Lockdown Amravati Corona Outbreak Corona Outbreak In Amravati Amravati Rural Area Amravati 130 Villages Sealed