Amravati : अमरावतीतले सगळी सिनेमागृहं शनिवारपासून बंद, पोलिसांच्या कारवाईमुळे थिएटर मालक नाराज
अमरावतीतले सगळी सिनेमागृहं शनिवारपासून बंद आहेत. विशेष म्हणजे कोरोनामुळे नव्हे तर मालकांनी परवान्यांचं नूतनीकरण न केल्यामुळे पोलीस आयुक्तांनी सिनेमागृह बंद केलीत. अमरावती शहरात सहा सिनेमागृहं आहेत. दरवर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस अर्ज केल्यानंतर जानेवारी अखेरपर्यंत परवान्यांचं नूतनीकरण होतं असं सिनेमागृहांचे मालक सांगतायत. तर यावर्षी आयुक्तांनी 31 डिसेंबरपर्यंत परवाने नूतनीकरणासाठी कागदपत्रं न दिल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सिनेमागृह बंद करण्याची नोटीस दिली. तर फायर ऑडिट नसल्यानं बंदीचे आदेश दिले असं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय.