Amravati Budhbhushan : शिवकालीन कागद वापरून बुधभूषणम ग्रंथाचं हस्तलिखित Chatrapati Sambhaji Raje

Continues below advertisement

बातमी छत्रपती संभाजी महाराजांच्या ग्रंथाची. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषणम ग्रंथ लिहिला. आता अमरावतीतील अजय लेंडे यांनी तब्बल चार वर्षे कठोर मेहनत घेऊन बुधभूषणमचा हस्तलिखीत ग्रंथ तयार केलाय. हा ग्रंथ तब्बल १ क्विंटल २४ किलो इतक्या वजनाचा आहे. १६४ पानांच्या ग्रंथाची लांबी ५ फूट आणि रुंदी तीन फूट इतकी आहे. पुढची २०० वर्षे हा ग्रंथ सुस्थितीत राहील असा दावा लेंडे यांनी केलाय. विशेष म्हणजे या ग्रंथासाठी शिवकालीन पद्धतीच्या कागदाचा वापर करण्यात आलाय. हस्तलेखन करताना विशेष प्रकारची शाई वापरण्यात आलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram