Amravati: बसपाच्या गटनेत्याला धक्काबुक्की,आमसभेत गोंधळ ABP Majha
Continues below advertisement
अमरावती महानगरपालिकेच्या आज झालेल्या अखेरच्या आमसभेत कचऱ्याच्या कंत्राटावरून वाद उफाळून आला. स्वच्छता कंत्राटदारांना मुदतवाढ द्यावी अथवा नाही या मुद्यावरून सभागृहात चर्चा सुरू असताना बसपाचे गटनेते चेतन पवार यांनी सत्ताधारी भाजप सदस्य कंत्राटदारांची वकिली करीत असल्याचा शब्दप्रयोग केला. यामुळे भाजपचे सदस्य चिडले आणि सभागृहात गोंधळाला सुरुवात झाली. त्यानंतर याच वादात एमआयएमच्या सदस्यांनी देखील भाजपला साथ देण्यासाठी उडी घेतली आणि बसपा गटनेत्यांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर मात्र मोठा गोंधळ सभागृहात दिसून आला. एमआयएमचे गटनेते अब्दुल नाझीम यांनी बसपाचे गटनेते चेतन पवार यांना धक्काबुक्की केली. मात्र इतर सदस्यांनी मध्यस्थी करून वाद शांत केला. त्यानंतर महापौर चेतन गावंडे यांनी सभा काहीकाळ स्थगित केली.
Continues below advertisement
Tags :
MIM Amravati Disputes Postponed Extension Public Meeting Garbage Contracts Sanitation Contractor Group Leader Chetan Pawar Ruling BJP Member Gondhal Abdul Nazim