Amravati: अमरावतीच्या मनपा आयुक्तांवर शाईफेक, पुतळा हटवल्यानं टार्गेट ABP Majha
अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली. राजापेठ उड्डाणपुलावरील अनधिकृत पुतळा हटवल्यानं आयुक्तांना टार्गेट केलं गेलं. त्याच्या निषेधार्थ महापालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केलंय. महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना पाहणी करण्यासाठी फोन करून बोलावण्यात आलं आणि काही लोकांनी त्यांच्यावर शाई फेकली. शाईफेक करणारे लोक नेमके कोण होते हे अद्याप समोर आलेलं नाही.
Tags :
Amravati Municipal Commissioner Shaifek Rajapeth Flyover Unauthorized Statue Praveen Ashtikar Shai