Amol Mitkari Worli Banners : वरळीत घड्याळवाला आमदार विजयी व्हावा; बॅनरवर उल्लेख

Continues below advertisement

Amol Mitkari Worli Banners : वरळीत घड्याळवाला आमदार विजयी व्हावा; बॅनरवर उल्लेख  

हेही वाचा : 

महाराष्ट्राची लाडकी लालपरी म्हणजे, सर्वसामान्यांच्या प्रवासाचं साधन. महाराष्ट्राला जोडणारी एसटी सतत धावत राहावी म्हणून कार्यरत असणारं एसटी महामंडळ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एसटी महामंडळात सुरू असलेला एक धक्कादायक घोटाळा समोर आला आहे. उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळानं हा धक्कादायक घोटाळा केल्याचं उघड झालं आहे. तशी एबीपी माझाला काही कंडक्टर्सनी तशी कबुलीदेखील एबीपी माझाला दिली आहे. एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा गैरवापर सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं आहे.   उत्पन्न वाढीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा एसटी महामंडळाकडून (ST Corporation) गैरवापर सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एबीपी माझानं हा मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. या घोटाळ्यामुळे फक्त तुम्हीच नाहीतर सरकार देखील चक्रावून जाईल. 75 वर्षांच्या वरील नागरिकांसाठी राज्य सरकारच्या वतीनं मोफत एसटी प्रवास योजना जाहीर केली आहे. मात्र, या योजनेचा गैरवापर करत एसटी स्वतःची तिजोरी भरतेय, हे काळं वास्तव सध्या समोर आलं आहे.   ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला नसतानाही या योजनेसाठी मिळणारं अनुदान लाटण्यासाठी एसटीनं शक्कल लढवल्याचं उघडकीस आलं आहे. नाव आणि ओळख जाहीर न करण्याच्या अटींवर काही कंडक्टर्सनी तशी कबुली एबीपी माझाला दिली आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्या Exclusive Report नं फक्त एसटीची पोलखोल केली नाही, तर सरकारच्या डोळ्यादेखत सरकारचा खिसा कसा कापला जातो? हे समोर आणलं आहे. आर्थिक तोट्याच्या खड्ड्यात अडकलेलं एसटीचं चाक बाहेर काढण्यासाठी सरकारी तिजोरीला भगदाड पाडण्याचं काम सध्या सुरू आहे.   75 वर्षांवरील नागरिकांसाठीची योजना नेमकी काय?  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठी घोषणा केली होती. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा मोफत प्रवास असणार आहे. यापूर्वी नागरिकांना प्रवासात 50 टक्के सवलत होती, परंतु आता यापुढे जे नागरिक स्त्री किंवा पुरुष 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष किंवा त्यावरील असतील त्यांना आता एसटी बसचा मोफत प्रवास असेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram