Amol Mitkari : ‘सोमय्या म्हणजे फुस्का बॉम्ब’, मिटकरींची राजकीय आतषबाजी
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी दिवाळीच्या फटाक्यांची राजकीय नेत्यांशी तुलना करत जोरदार फटकेबाजी केली आहे. या राजकीय आतषबाजी कार्यक्रमात त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांवर आपल्या खास शैलीत भाष्य केले. 'सुतेली अॅटमबॉम्ब तडकाफडकी फुटला पाहिजे, पण त्यात मला किरीट सोमय्या दिसतात, ज्यांचे ९० टक्के बार फुस्के ठरले आहेत,' असा थेट टोला अमोल मिटकरींनी लगावला. त्यांनी राज ठाकरे यांना सतत भूमिका बदलणारे 'बटरफ्लाय' फटाका म्हटले, तर वकील गुणरत्न सदावर्ते यांना समाजात विष पसरवणारी 'साप गोळी' संबोधले. दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांची तुलना त्यांनी 'आकाशदिव्या'शी केली, जे राजकीय मतभेद असले तरी एक आश्वासक नेतृत्व असल्याचे ते म्हणाले. आपल्याच पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी 'हिंदूंच्या दुकानातून फटाके खरेदी करा' या केलेल्या वक्तव्यावर, 'सद्दाम' नावाचा फटाका दाखवत त्यांनी घरचा आहेर दिला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement