Amol Mitkari on Suresh Dhas : 24 वर्ष जुनी केस, सुरेश धसांना घेरलं! अमोल मिटकरींचे खळबळजनक आरोप

Continues below advertisement

Amol Mitkari on Suresh Dhas : 24 वर्ष जुनी केस, सुरेश धसांना घेरलं! अमोल मिटकरींचे खळबळजनक आरोप

संतोष देशमुख हत्याप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक आघाडी उघडलीय. इतकंच नव्हे तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. धस यांच्या या आक्रमकतेला 
राष्ट्रवादीनंही जशास तसा पलटवार केलाय. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी माझाशी बोलताना सुरेश धस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. संतोष देशमुख यांच्या हत्येआधी दोन दिवसांपर्यंत धस वाल्मिक कराडच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक आरोप मिटकरींनी केलाय. धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावणे यासारख्या आरोपांची यादी प्रचंड मोठी असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यासाठी त्यांनी २००१ मधल्या पाथर्डी तालुक्यातल्या मोठ्या दरोड्याचा दाखला दिलाय. धस यांच्याबाबतच्या अनेक प्रकरणाच्या पुरावे योग्यवेळी बाहेर काढण्याचा इशाराही मिटकरींनी दिलाय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram