Amol Mitkari on Nana Patole : पटोले संत नाहीत, कार्यकर्ते नोकर नाहीत, पाय धुण्यावरून मिटकरींचा टोला
आपल्या नेत्यासाठी काहीपण याचा प्रत्यय अकोल्यात आलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यकर्त्याने पटोलेंचे पाय धुतल्याचा व्हिडीओ समोर आलाय.. त्याचं झालं असं अकोल्यात आलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं पटोलेंनी दर्शन घेतलं.. पालखी दर्शनानंतर पटोले चिखलातून मार्ग काढत गाडीपर्यंत पोहोचले.. त्यावेळी पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय त्यांच्या एका कार्यकर्त्याने धुतलेत.. कार्यकर्त्याच्या या कृतीमुळे नाना पटोले वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे..
नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये - मिटकरी नाना पटोलेंचे पाय धुण्यावरून आमदार मिटकरींचा टोला पटोले संत नाहीत, कार्यकर्ते नोकर नाहीत - मिटकरी
नाना पटोले यांच्या कृत्याची राहुल गांधी यांनी दखल घ्यावी आणि नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून काढावे ... सचिन खरात
नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याची बातमी समजत आहे, नाना पटोले जी आपण ते सतत महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे भाषणात सांगता मग ज्या महापुरुषांनी देशाला समानता दिली त्याच महाराष्ट्र राज्यात तुम्ही कार्यकर्त्यांकडून पाय धुऊन घेताना दिसत आहे अत्यंत चुकीचे आहे, या यातून तुम्ही श्रेष्ठ दाखवण्याचा स्वतःला प्रयत्न करताना दिसत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे याची दखल माननीय राहुल गांधी यांनी घ्यावी आणि नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून काढावे.