Amol Mitkari On Ajit Pawar : महायुतीत दादांचं खच्चीकरण सुरू; पुढे काय म्हणाले अमोल मिटकरी ?

Continues below advertisement

Amol Mitkari On Ajit Pawar :  महायुतीत दादांचं खच्चीकरण सुरू; पुढे काय म्हणाले अमोल मिटकरी ? राज्याच्या राजकारणातून एक अतिशय मोठी बातमी आहेय..... अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलीये. अकोला येथे 'एबीपी माझा'शी साधलेल्या 'एक्सक्लूझिव्ह' संवादादरम्यान त्यांनी ही मागणी केलीय. दरम्यान, हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केलीये. महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोये. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करीत असल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवून शकतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय. आमदार मिटकरींशी 'एक्सक्लूझिव्ह' संवाद साधलाय प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram