Amol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीका

Continues below advertisement

मविआतील समन्वयाच्या अभावामुळे शरद पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभेतल्या पराभवानंतर मविआची बैठक झाली नाही. पालिका निवणुकीच्या तोंडावर तिन्ही पक्षांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे पवार नाराज असल्याचं समजतंय.उद्धव ठाकरे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करतायत. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत कलगीतुरा रंगलाय. त्यामुळे मविआत बिनसल्याचं चित्र आहे. मविआत समन्वय वाढायला हवा यासाठी पवार आग्रही आहेत, पण ते होत नसल्याचं ते नाराज झाल्याचं समजतंय. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी यांनीही ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर टीका केलीय. त्यांनी काय म्हटलंय पाहूयात...

अमोल कोल्हेंची टीका, मविआत ठिणगी

  • पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही
  • शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही
  • मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे आपल्या पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठी जागा
  • पराभव हा आधी मनात होतो, त्यानंतर रणांगणात होतो 
  • मरगळ झटका आणि कामाला लागा
  • तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत
  • लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram