Amol Kolhe : मोहिते पाटील कुटुंबावर कुणीही दबाव टाकू शकत नाही - अमोल कोल्हे

Continues below advertisement

Amol Kolhe : मोहिते पाटील कुटुंबावर कुणीही दबाव टाकू शकत नाही - अमोल कोल्हे  माढा लोकसभा उमेदवारीचा तिढा वाढणार असून मोहिते पाटील यांच्या नाराजीचा फायदा उठवण्यासाठी आज राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनी अकलूज येथील निवासस्थानी भेट घेतली . आपण एका लग्नाला आलो होतो म्हणून जाता जाता भेटलो अशी उत्तरे देत कोल्हे यानी वेळ मारून नेली .  मात्र भाजपने डावलल्याने नाराज झालेले मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करायचा तयारीत आहेत . यासंदर्भात आज मोहिते यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी कोल्हे पोचले होते . यापूर्वी कोल्हे यांनी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके याना फोडून महायुतीला धक्का दिला होता . आता मोहिते पाटील यांनाही कोल्हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नेण्याच्या तयारीत आहेत .      मोहिते यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये असा पक्षाचा संदेश घेवून प्रशांत परिचारक यांनी आधी मोहिते कुटुंबाची भेट घेतली होती .. यानंतर लगेचच कोल्हे पोचल्याने मोहिते स्वगृही जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram