Amol Kolhe Shirur Result : प्रत्येक फेरीत आघाडीवर, कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
शिरुर: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरचा समावेश आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगला होता. गेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे हे आढळराव पाटलांचा (Shivajirao Adhalrao patil) पराभव केला होता. यंदाही ते यशाची पुनरावृत्ती करणार असल्याचे चित्र पहिल्याफेरी अखेर दिसत आहे. हे चित्र सकाळी 9 पर्यंतचे आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे हे पहिल्या फेरी अखेर 9000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघाचा अपवाद वगळता पाचही विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांना आघाडी मिळाली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे आमदार महेश लांडगे आहेत. पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे यांना 9000 मतांची आघाडी महायुती चे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमदार संख्या – 6
- जुन्नर– अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस)
- आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
- खेड-आळंदी – दिलीप मोहिते पाटील
- शिरूर – अशोक पवार
- भोसरी – महेश लांडगे (भाजप)
- हडपसर – चेतन तुपे