Amol Kolhe : कांदा उत्पादकांना 4 हजारांचा दर द्या, अमोल कोल्हेंची केंद्र सरकारकडे मागणी
Continues below advertisement
केंद्रानं जाहीर केलेला चोवीसशे दहा रुपयांचा दर आम्हाला मान्य नाही, कांदा उत्पादकांना 4 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर द्या, अशी मागणी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. शरद पवार गटानं आज पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये आंदोलन केलं. कांदा उत्पादक शेतकरी गेल्या तीन ते चार वर्षांपासून नाडला गेलाय, तेव्हा केंद्र सरकार झोपलं होतं का, अशी टीका देखील कोल्हे यांनी केली.
Continues below advertisement