Amnesiac : स्मृतीभ्रंश वयाच्या तिशी चाळीशीतच तुमच्या मेंदूचा ताबा घेतोय : ABP Majha
Continues below advertisement
स्मृतीभ्रंश हा घरातल्या आजी आजोबांना जडलेला आजार हेच आपल्याला आजवर माहित होतं. मात्र आता हा स्मृतीभ्रंश वयाच्या तिशी चाळीशीतच तुमच्या मेंदूचा ताबा घेतोय. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अहवालानुसार समोर आलेली आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. जगात सद्या 5.7 कोटी नागरिक स्मृतीभ्रंशानं बाधित आहेत आणि त्यापैैकी केवळ 53 लाख हे 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. बदलती जीवनशैली, तणाव,चिंता, नैराश्य यामुळे कमी वयात ब्रेन फॉगच्या तक्रारी अनेक तरुणांकडून येत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र कमी वयात अशा स्मृतीभ्रंशाचं लवकर निदान होत नसल्यानं नागरिकांनी आणि विशेषतः महिलांनी सतर्क राहणं गरजेचं असल्याचं डॉक्टर्सनी सांगितंलय
Continues below advertisement