Amit Thackeray Yavatmal : यवतमाळमध्ये अमित ठाकरे फुटबाॅल खेळण्यासाठी मैदानात उतरले

Continues below advertisement

Amit Thackeray Yavatmal : यवतमाळमध्ये अमित ठाकरे फुटबाॅल खेळण्यासाठी मैदानात उतरले 

अमित ठाकरे यांनी फुटबॉल आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला, यवतमाळच्या वणीमध्ये दौऱ्यादरम्यान मुक्कामाला असताना शेजारच्याच स्पोर्टस क्लबमध्ये लुटला खेळण्याचा आनंद.

 यवतमाळच्या वणी येथे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी चौकामध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. काल चंद्रपूर (Chandrapur) येथे झालेल्या सभेत विधानसभेच्या दोन उमेदवारांची घोषणा राज ठाकरेंकडून करण्यात आली. त्यामुळे आज वणी येथे आयोजित या सभेत देखील विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. वणी हे सुरुवातीपासूनच मनसेचा (MNS) गड राहिलेला आहे. दरम्यान, वणी या ठिकाणी मनसेचा उमेदवार या पूर्वी निवडून आला असल्याने त्या अनुषंगाने राज ठाकरे आज  कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची संबोधित करणार आहे. दरम्यान या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

चंद्रपूर पाठोपाठ वणीतही उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (VidhanSabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS)पक्ष  देखील मैदानात उतरला असून त्या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी करत आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. तर मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे हे विदर्भ दौरा करत आहेत. दरम्यान, आज राज ठाकरे हे यवतमाळच्या वणी येथे सभा घेत पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी नुकतेच विदर्भ दौऱ्यात आणखी दोन उमदेवारांच्या नावाची घोषणा केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram