ABP News

Amit Thackeray निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पाहा काय म्हणाले अमित ठाकरे ABP Majha

Continues below advertisement

आणखी एका ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी भविष्यात निवडणूक लढवू शकतो असं वक्तव्य केलंय. गरज पडली तर मीदेखील निवडणूक लढवू शकतो, असं अमित ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.... त्यामुळे आदित्य ठाकरेंनंतर आता अमित ठाकरे हेदेखिल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपण निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आणि ती खरी करून दाखवली. राज ठाकरे यांनी मात्र आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी भूमिकाही जाहीर केली होती. पण त्यांनी निवडणूक मात्र लढवली नाही. 2019 मध्ये आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आणि निवडणूक लढवणारे ते पहिले ठाकरे ठरले. त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपद आलं आणि ते विधान परिषदेवर निवडून गेले. आता अमित ठाकरे यांनीही निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिलेत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram