Amit Thackeray File Nomination : पहिल्यांदा विधानसभा लढवणार. अर्ज भरण्यापूर्वी अमित ठाकरे काय बोलले?
Amit Thackeray File Nomination : पहिल्यांदा विधानसभा लढवणार. अर्ज भरण्यापूर्वी अमित ठाकरे काय बोलले?
उमेदवारी अर्ज भरण्याआधी सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील उद्यान गणेशमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं. यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला जाऊन अभिवादन केलं. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांना देखील अमित ठाकरेंनी अभिवादन केलं. त्यानंतर अमित ठाकरेंनी पत्नीसह सिद्धविनायक मंदीरात जाऊन दर्शन घेतले. अमित ठाकरे उमेदवारी दाखल करताना मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी गर्दी केली होती.
अमित ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मी निवडणुकीसाठी तयार आहे. बाकी कोणाबाबत मला माहिती नाही. कोण फॉर्म मागे घेणार याबाबत माहीत नाही. मी माझा व्हीजन घेऊन पुढे जाणार आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. तसेच माझ्यावर दडपण नाही. मला माध्यमांशी बोलतानाचा दडपण जाणवतं, हेच एक दडपण आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली. तसेच आदित्य ठाकरेंनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात असं पत्रकारांनी सांगितल्यानंतर, त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत, असं अमित ठाकरे म्हणाले. मला माहीम मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या घरापर्यंत पोहाचायचं आहे, अशी माहिती देखील अमित ठाकरेंनी दिली.