Amit Thackeray Exclusive : लोकांचा साहेंबांवर विश्वास; आमचं व्हिजन घेऊन निघालो आहोत - अमित ठाकरे

Continues below advertisement

Amit Thackeray Exclusive : लोकांचा साहेंबांवर विश्वास; आमचं व्हिजन घेऊन निघालो आहोत - अमित ठाकरे

 मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यंदा माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे आज उमेदवारी भरणार आहेत. अमित ठाकरे सकाळी नऊ वाजता मीनाताई ठाकरे पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला अभिवादन करतील, अशी माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराला जोरदार सुरुवात देखील केली आहे. याचदरम्यान त्यांच्या एका विधानाची चर्चा सध्या रंगू लागली आहे. अमित ठाकरेंनी साम या वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे.  मी आजारी होतो तेव्हा मला माहित होतं की, माझे वडील काय आहेत या फोडाफोडीचा त्यांना काही फरक पडणार नव्हता आणि ते पुढे काय करू शकतात हेही मला माहीत होतं. पण त्यावेळी नैतिकता पाळली गेली नाही, असं अमित ठाकरे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram