Amit Shah vs Adhir Ranjan : अधीर रंजन यांचं चॅलेंज...अमित शाह यांचं सडेतोड उत्तर ABP MAJHA
Continues below advertisement
जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर सडकून टीका केली. शस्त्रसंधी जाहीर करणं आणि काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणं या नेहरूंच्या घोडचुका होत्या असा थेट आरोपच शाह यांनी केला. पाकव्याप्त काश्मीरच्या निर्मितीला नेहरूच जबाबदार आहेत, असंही शाह यांनी म्हटलं. यावरून संसदेत काही वेळ गदारोळ झाला, या दरम्यान काँग्रेसच्या अनेक खासदारांनी वॉकआऊट केलं.
Continues below advertisement