ABP News

Amit Shah Varsha Bangalow : शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी अमित शाह बाप्पाच्या दर्शनाला

Continues below advertisement

Amit Shah Varsha Bangalow : शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी अमित शाह बाप्पाच्या दर्शनाला

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते अशी ख्याती असलेले अमित शाह यांनी सोमवारी सकाळी सपत्नीक मुंबईतील लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेतले. यावेळी अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, दीपक केसरकर, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे हे नेते लालबागमध्ये उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुंबईत असूनही अमित शाह यांच्यासोबतच्या या दौऱ्यावेळी उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. 

अजित पवार हे रविवारी महायुतीच्या बैठकीसाठी तातडीने बारामतीहून मुंबईला आले होते. मात्र, ही बैठक होऊ शकली नव्हती. त्यानंतर अजित पवार हे त्यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावरच होते. मात्र, तरीही अजित पवार सकाळी अमित शाह यांच्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला का आले नाहीत, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडतील, अशी चर्चा सुरु आहे. शिंदे गटाच्या नेत्यांकडून अजित पवार यांच्याविरोधात टीका केली जात आहे. अजित पवार यांना महायुतीमधून बाहेर पडायला भाग पाडणे, हा शिंदे गटाचा उद्देश असल्याची चर्चा आहे. अशातच आज अजित पवार हे अमित शाह यांच्यासोबत लालबागमध्ये दिसून न आल्याने या सगळ्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे.  अजितदादा अमित शाह यांच्यासोबत दौऱ्यात का नव्हते, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram