Amit Shah Speech Ratnagiri : राहुल अन् पवारांना शरण जातील ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाहीत
Continues below advertisement
Amit Shah Speech Ratnagiri : ..ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाहीत, शाहांचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे काँग्रेससोबत, रत्नागिरीतील सभेतून अमित शाहांची टीका तर ठाकरेंनी काँग्रेसचा जाहीरनामा मान्य आहे का सांगावं, अमित शाहांचा सवाल..
"उद्धव ठाकरे सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिम्मत करू शकतात का ? हिंमत नसेल तर तुम्ही नकली शिवसेना चालवत आहात, खरी शिवसेना शिंदेंकडेच आहे", असं म्हणत गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि काँग्रेसवर निशाणा साधला.
Continues below advertisement