Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार का? अमित शाह म्हणाले?
Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार का? अमित शाह म्हणाले?
मुंबई : एनडीएनं (NDA) शेवटच्या टप्प्याआधीच बहुमताचा टप्पा गाठलाय असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) केलीय. अमित शाहांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली, त्यात त्यांनी हा दावा केला. विरोधी पक्ष किती सक्षम असावा हा निर्णय आता जनतेनं घ्यावा असं शाह म्हणाले. अखेरचा टप्पा पार होण्याआधीच एनडीएने 300 जागांचा आकडा गाठल्याचं ते म्हणाले. राज्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत घेणार का या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिलं. राज्यात आमची शिवसेनेशी युती आहे, आणि युतीत सर्वकाही आलबेल आहे असं ते म्हणाले. तसेच त्यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) देखील निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत घेणार का? अमित शाह म्हणाले...
राज्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत घेणार का या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिलं. अमित शाह म्हणाले, राज्यात आमची शिवसेनेशी युती आहे, आणि युतीत सर्वकाही आलबेल आहे .