Amit Shah on Dr Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अमित शाह नेमकं काय बोलले? UNCUT
Amit Shah on Dr Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अमित शाह नेमकं काय बोलले? UNCUT
हे ही वाचा...
देशात 'एक देश एक निवडणूक' लागू करण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत. हे विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे. या विधेयकाला 129 वे घटनादुरुस्ती विधेयक म्हटले जाईल. केंद्र सरकार अधिसूचना प्रसिद्ध करेल त्या दिवसापासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती आहे. पण त्यापूर्वी हे विधेयक संसदेने विशेष बहुमताने संमत करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याच्या अंमलबजवणीची तारीख केंद्र सरकार ठरवणार असल्याची माहिती आहे.
देशात 'एक देश एक निवडणूक' लागू करण्यासाठी राज्यघटनेतील कलम 82 नंतर नवे कलम 82A समाविष्ट केले जाणार आहे.
कलम 82 A तील नवी तरतूद काय आहे ?
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर राष्ट्रपती पहिल्यांदा या कलमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी लोकसभेची बैठक बोलावतील आणि त्यासाठीची अधिसूचना ज्यादिवशी प्रसिद्ध होईल त्या तारखेला ‘नियुक्तीची तारीख’ म्हटलं जाईल.
नियुक्तीच्या तारखेनंतर ज्या विधानसभांचे कार्यकाळ संपून निवडणुका होतील त्यांचा कार्यकाळ लोकसभेच्या कार्यकाळासोबत संपुष्टात येईल (उदा. लोकसभेनंतर महाराष्ट्राची निवडणूक सहा महिन्यांनी झाली असली तरी पुढल्या लोकसभा निवडणुकीवेळी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेला साडेचार वर्षे झाली असतील तेव्हा विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला असे समजले जाईल).
निवडणूक आयोग एकाच वेळी लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका घेईल. भारतीय संविधानाच्या भाग 15 मधील निवडणुकीविषयीच्या तरतुदी लोकसभा आणि राज्य विधानसभांना लागू राहतील.