9 Sec News : 9 सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 11 ऑक्टोबर 2025
Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वक्तव्यांनी राजकारण तापलं आहे. 'घुसखोरांमुळे देशात मुस्लिमांची संख्या वाढत आहे', असं मोठं वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे. दुसरीकडे, पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) 'हंबर्डा मोर्चा'ची हाक दिली आहे. यातच महायुतीमधील (Mahayuti) अंतर्गत मतभेदही समोर आले असून, 'काही लोक आमचा छळ करत आहेत,' असा सूचक इशारा मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिला आहे. भाजपने (BJP) मराठवाड्यात स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात पहाटे पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement