Amit Shah Interview on Lok Sabha : बहुमताचा दुरुपयोग इंदिरा गांधींनी केला, अमित शाहांचा आरोप

Amit Shah Interview on Lok Sabha : बहुमताचा दुरुपयोग इंदिरा गांधींनी केला, अमित शाहांचा आरोप

मुंबई : संविधान बदलण्यासाठी आमच्याकडे 10 वर्षापासून बहुमत आहे पण आम्ही तसा प्रयत्न कधी केला नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) विजयाचा विश्वास व्यक्त केला. सोबतच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांच्यावरही टीका केली. केजरीवालांच्या अंतरिम जामिनाला काही जण विजय समजत आहेत. पण केजरीवाल जिथे जातील तिथे लोकांना मद्य घोटाळा आठवेल, अशी टीका शाहांनी केली. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.   केवळ राजकीय स्थैर्यासाठीच 400 जागा हव्यात, असेही ते म्हणाले.  

अमित शाह म्हणाले, आमच्याकडे 10 वर्षापासून बहुमत, संविधान बदलण्यचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही. बहुमताच्या दुरुपयोगाचा इतिहास माझ्या पक्षाचा नाही, प्रचंड बहुमताने मोदी पुन्हा सत्तेत येतील. देशाच्या सुरक्षेसाठी आम्हाला  400 जागा हव्या आहेत. बहुमताचा दुरुपयोग काँग्रेसने केला आहे. इंदिरा गांधीच्या काळात काँग्रेसने सत्तेचा दुरुपयोग केला आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola