Amit Deshmukh | सदोष किट प्रकरणी खोलवर माहिती न घेता आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य: अमित देशमुख

राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यासंदर्भात बोलताना खोलवर माहिती न घेता राजेश टोपेंनी वक्तव्य केल्याचं म्हणत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते जालना दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. सदोष पीसीआर किट्स प्रकरणी एका समितीची स्थापना केली असून याचा अहवाल आल्यावर कारवाई केली जाणार असल्याचं अमित देशमुख यांनी म्हंटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola